
सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या शंभर दिवसांच्या उपक्रमांची अंमलबजावणी होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आर्टिफिशल इंटीलिजन्स चा वापर करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरावी म्हणून राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यांनी चांगली सूचना केली होती. त्याबाबतचे हे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील साफसफाई, अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती नागरिकांच्या सेवा गतिमान करण्यात आले आहेत. प्रशासकीय भावनात हर्बल गार्डन म्हणजे वनौषधी बाग केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचना व शासनाचा शंभर दिवसाचा कार्यक्रम याची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रभावी करीत आहे. त्याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. यावेळी अपर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट असावी, या जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत सुशोभीत जिल्हा परिषद म्हणून अग्रेसर असावी, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व नागरिकांना गतिमान सेवा मिळावी या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
जिल्हा परिषदेत अनेक बदल व अनेक घडामोडी करण्यात आल्या आहेत. भावनात व भावनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कचरा प्लास्टिक याचे ढीग होते त्याची साफसफाई घेण्यात आली. जुने फर्निचर जुनी वाहने निर्लेखित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली जवळपास ४० वाहने सडलेल्या अवस्थेत असून त्याची निर्लेखन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. कार्यालयामध्ये साठलेली फार मोठी रद्दी बाहेर काढून जवळपास एक लाखाची कागदाची रद्दी विकून जि प उत्पन्नात भर टाकण्यात आली आहे. कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स रद्दी याचीही निर्लेखन प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्याचेही टेंडर काढण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सुशोभित होण्यास मदत झाली आहे. रंगरंगोटी व झाडांच्या शुशोभित कुंड्या ठेवून भावनातील आकर्षण वाढविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील तसेच पंचायत समित्यांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यासाठी दप्तर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत यांच्या आकस्मित भेटी देण्यासाठी सर्वच खाते प्रमुख अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या काळात आकस्मिक भेटी अधिकारी करणार आहेत. एका तालुक्याचे अधिकारी दुसऱ्या तालुक्यात पाठवून क्रॉस व्हेरिफिकेशन द्वारे ही तपासणी मोहीम सक्रीय केली जाईल. असेही यावेळी रवींद्र खेबुडकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेंकडून नागरिकांसाठी सात प्रकारच्या सेवा दिल्या जातात. विविध दाखले व नागरिकांच्या सेवा तात्काळ मिळण्यासाठी काल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 28 एप्रिल हा लोकसेवा दिन या जिल्ह्यात साजरा होत आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून 10027 घरकुलांची मंजुरी झाली असून ती पूर्णत्वास गेली आहेत व त्या घरकुलांचे पैशाचे वितरणही लाभार्थ्यांना झाले आहे. उमेद अंतर्गत 28 हजार पाच लखपती दीदींना या जिल्ह्यात लाभ देण्यात आला आहे. अशी माहिती ही यावेळी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे वेबसाईट अद्यावत करण्यात येत असून अनेक माहिती त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. यापुढे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या निविद्या प्रक्रिया ही या वेबसाईटवर झळकणार आहेत. ही जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर असावे म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांचा कटाक्ष आहे. वा त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाहीचे पाऊल पुढे टाकले आहे असेही रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.