आवळेगाव तालुका कुडाळ येथे रानभाजी महोत्सव 2025 उत्साहात संपन्न

Edited by: निलेश ओरसकर
Published on: August 17, 2025 19:46 PM
views 27  views

कुडाळ : आवळेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), आवळेगाव ग्रामपंचायत व आवळेगाव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाजी महोत्सव 2025” नुकताच पार पडला. या प्रसंगी सरपंच श्रीमती पूर्वा सावंत, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती प्रगती तावरे, तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, उपसरपंच विवेक कुपेरकर, माजी सरपंच राजेंद्र सावंत, मुख्याध्यापक दशरथ काळे, मार्गदर्शक रामचंद्र शृंगारे, मंडळ कृषी अधिकारी तानाजी सगरे, श्रीमती गायत्री तेली, विजय घोंगे, परीक्षक श्रीमती आर. आर. कुडाळकर, ग्राम महसूल अधिकारी अमेय पाटकर,सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे  तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अनुभवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळकरी मुलांच्या जागर फेरीने झाली. त्यानंतर सरपंच यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांनी शाळकरी मुलांनी लावलेल्या रानभाजी व औषधी वनस्पतींच्या स्टॉलना भेट दिली. महिलांनी रानभाजीपासून पाककला पदार्थांची निर्मिती करून आपले कौशल्य दाखवले. दीपप्रज्वलनानंतर स्वागतगीताने कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यानंतर मान्यवरांचे मनोगत व रामचंद्र शृंगारे यांचे मार्गदर्शन झाले. शाळकरी मुलांनी रानभाजीचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. स्पर्धेत विजेत्या महिला व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तालुका कृषी कार्यालयाच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने रानभाजी महोत्सव 2025 यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे यांनी आभार व्यक्त केले.