
कणकवली : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन येथे नुकत्याच रानभाज्या पाककला स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये एकूण 63 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला.
स्पर्धेचे उद्घाटन गोपुरी आश्रमच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका अक्षया राणे, स्पर्धेच्या परीक्षक वसुधा माने, अर्पिता मुंबरकर, व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक करताना शाळेच्या विज्ञान शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांनी रानभाज्या पाककला स्पर्धेचे हे नववे वर्ष असून विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये रानभाज्यांबद्दल जनजागृती करणे व विद्यार्थ्यांना रानभाज्याचा आहारात समावेश करण्यासाठी प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा प्रमुख हेतू आहे हे स्पष्ट केले अर्पिता मुंबरकर यांनी निरोगी जीवनासाठी रानभाज्या या अत्यंत उपयुक्त आहेत तरी सर्वांनी यांचा आहारात समावेश करावा तसेच फास्ट फूड खाणे टाळा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे प्रत्येक वर्गवार प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले इयत्ता दुसरी१) देवयानी राणे २) रुही बाईत इयत्ता तिसरी १) दूर्वा परब२) आस्या बागवान इयत्ता चौथी १) हार्दिक राणे २) चिन्मय चव्हाण इयत्ता पाचवी १) आयुष फोंडेकर २) दूर्वा मेजारी इयत्ता सहावी १) नेहल राणे २) गिरीजा गुरव इयत्ता सातवी १) प्रगती कुलकर्णी २) हर्षिका राणे
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश चव्हाण व उपाध्यक्ष सौ सायली राणे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षया राणे यांनी अभिनंदन केले आहे