
कुडाळ : पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने १९ ऑगस्ट २०२५ रोजी रानभाजी पाककला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती कार्यालयातील अल्पबचत सभागृहात ही स्पर्धा होणार असून, कुडाळ तालुक्यातील बचत गट सदस्य, पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत:
व्यक्तीगत सहभाग: ही स्पर्धा वैयक्तिक स्वरूपाची असेल.
कुडाळ तालुक्यापुरती मर्यादित: स्पर्धक कुडाळ तालुक्यातील असणे आवश्यक आहे.
पदार्थांची निवड: स्पर्धकांनी कोकणातील रानभाज्या वापरून पदार्थ तयार करायचे आहेत. एकापेक्षा जास्त पदार्थ बनवल्यास स्पर्धकाने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गुणांकन केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे: ज्या भाजीचा पदार्थ बनवला आहे, त्या भाजीचा मूळ नमुना आणि पाककृती (लिखित स्वरूपात) सोबत आणणे अनिवार्य आहे.
साहित्य: पदार्थ मांडणीसाठी लागणारे प्लेट्स आणि सजावटीचे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.
गुणांकन: चव, पौष्टिक मूल्य, मांडणी (प्लेटिंग) आणि स्वच्छता या निकषांवर स्पर्धकांना गुण दिले जातील.
वेळेचे बंधन: पदार्थ मांडणीची वेळ सकाळी ९.०० वाजता सुरू होईल. वेळेत उपस्थित न राहणाऱ्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.
बक्षिसे: पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत कृषी विभाग, पंचायत समिती कुडाळ यांच्याकडे जमा करावीत. अधिक माहितीसाठी श्रीमती सोनिया पालव (विस्तार अधिकारी, कृषी) यांच्याशी ९४०४४३९५७५ या क्रमांकावर किंवा श्री. संदेश परब (विस्तार अधिकारी, कृषी) यांच्याशी ९४२३८८१६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.