भाजप युवा मोर्चा वेंगुर्लाच्या वतीने मठ शाळा नं २ ला Wi-Fi सुविधा

Edited by: दिपेश परब
Published on: October 16, 2023 18:15 PM
views 165  views

वेंगुर्ला : भाजप युवा मोर्चा च्या वतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द करण्यात आले. मठ शाळेला वाय फाय सुविधा उपलबध नव्हती. याची माहिती युवा मोर्चा कार्यकर्त्यांना मिळताच तातडीने शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली. सध्याचे युग हे इंटरनेट चे असल्यामुळे शाळेतील प्रशासकीय कामं करण्यास अडथळा येत होता यामुळे मुख्याध्यापिका पाडगावकर मॅडम यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी अजित नाईक, हितेश धुरी, हेमंत गावडे, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, समीर नाईक, मारुती दोडशानट्टी, मठ ग्रामपंचायत सदस्य शमिका धुरी, राऊळ मॅडम, मंदार गावडे, ऋत्विक आंगचेकर, प्रथमेश प्रभू तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.