
रत्नागिरी : मनसेचे नेते वैभव खेडेकर पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी खेडेकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर खेड न्यायालयात सुनावणी हाेणार आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता गणेशोत्सवात लॉटरी काढल्याचा आराेप आहे. त्याबाबत खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी रत्नागिरीचे एलसीबी पथक सध्या वैभव खेडेकर यांचा शोध घेत आहे.