राष्ट्रवादीने शरद पवारांचं आत्मचरित्र का पाठवलं निलेश राणेंना ?

आंदोलन करण्याचं कारण काय ?
Edited by: विनायक गावस
Published on: June 09, 2023 13:52 PM
views 78  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी मार्गानं  आंदोलन केले. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत शरद पवार यांच 'लोक माझे सांगाती' आत्मचरित्र निलेश राणेंना स्पीड पोस्ट करण्यात आल. सावंतवाडी पोस्ट ऑफिसमधून हे आत्मचरित्र निलेश राणेंच्या पत्यावर स्पीड पोस्ट करण्यात आल. 


याप्रसंगी अर्चना घारे-परब म्हणाल्या, निलेश राणे यांनी शरद पवारांविषयी केलेल वक्तव्य निषेधार्ह आहे. शरद पवार यांना देशात आदर आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण क्रीडा आदी क्षेत्रांत त्यांनी केलेलं कार्य यामुळे हा आदर त्यांना दिला जातो. निलेश राणेंचे वडील नारायण राणे हे देखिल शरद पवारांचा आदर करतात. त्यामुळेच शरद पवार समजून घेण्यासाठी 'लोक माझे सांगाती'आत्मचरित्र निलेश राणेंना स्पीड पोस्ट करण्यात आल आहे. त्यांनी ते आत्मचरित्र वाचाव असं मत व्यक्त केले.


यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार दर्शना बाबर देसाई, महिला शहराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, पूजा दळवी आदी उपस्थित होते.