कुडाळमध्ये कोणाचा PA ठरला भारी..?

Edited by: भरत केसरकर
Published on: November 06, 2023 17:54 PM
views 1310  views

कुडाळ : निलेश राणेंचे पीए योगेश घाडी हे आमदार वैभव नाईक यांचे पीए बाबी गुरव यांना भारी ठरले आहेत. कुडाळ तालुक्यातील बहुचर्चित आणी हायहोल्टेज ड्रामा म्हणून ओळखली जाणारी भडगाव ग्रामपंचायतीवर निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ही ग्रामपंचायत एकहाती जिंकत आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपचे गुणाजी लोट हे १०१ मतांनी सरपंचपदी विजयी झाले आहेत. दोन स्वीय सहाय्यकामधील लढाई ही योगेश घाडी यांनी जिकंत बाबी गुरव यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. भडगाव मध्ये ७ पैकी ६ सदस्य हे भाजपचे विजयी झाले आहेत. तर केवळ एका जागेवर ठाकरे सेनेला समाधान मानावे लागल आहे.

कुडाळ तालुक्यातील भडगाव हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ल्या मानला जातो.या बालेकिल्ल्याला विशेष महत्त्व यासाठी होत की आमदार वैभव नाईक यांचे पीए असलेले बाबी गुरव यांच हे होमपीच.याच होमपीचवरील निलेश राणे यांचे पीए असलेले योगेश घाडी हे माजी खासदार निलेश राणे यांचे सध्या पीए आहेत.या दोन पीए मधील ही लढत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजली होती.वैभव नाईक यांनी काही काळ ही ग्रामपंचायत स्वताच्या ताब्यात ठेवली होती.पण ह्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणी मार्गदर्शनाखाली भाजप एकदिलाने प्रचारात उतरला आणी भाजपने मोठा विजय मिळवत ठाकरे सेनेच्या गडाला सुरूंग लावला.

शेवटी निवडणुकीत "जो जनता वही सिकंदर" अस म्हटल जात.त्यामुळे दोन दिग्गज नेत्यांच्या "पीए"तील ही लढाई "योगेश घाडी" यांनी जिंकत बाबी गुरवांना आसमान दाखवल.आणी "जो जीता व्ही सिकंदर" हे सिद्ध करून दाखवल आहे. त्यामुळे "योगेश घाडी" यांनी ही लढाई जिंकत आपले नेते निलेश राणे यांना दिवाळीची भेट दिली आहे. मात्र भडगावातील योगेश घाडी आणी बाबी गुरव या दोन नेत्यांच्या पीए मधील ही गरमपंचायत निवडणुकीची लढाई मात्र लक्षवेधी ठरली होती. ही लढाई योगेश घाडी यांनी स्वतच्या होमपीचवर जिंकत ठाकरे सेनेचा गड काबिज करत भाजपला मोठ यश मिळवून दिल आहे.ह्या निकालानंतर भाजपचे रणजित देसाई, दादा साईल,संजय वेंगुर्लेकर,विनायक राणे,दिपक नारकर,योगेश घाडी,रूपेश कानडे आदी पदाधिकारी व इतर  कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.