
दोडामार्ग : ग्रामसंग्राम जाहीर होताच दोडामार्ग तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना दोडामार्ग कार्यालयात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महीला जिल्हाप्रमुख सौ. निता सावंत कविटकर व तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकासंघटक गोपाळ गवस, राजेंद्र निंबाळकर, शैलेष दळवी, तुकाराम बर्डे, प्रविण गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री दाजी गवस, रेडकर, भगवान गवस विनायक शेटये, संजय गवस, दादा देसाई, कानु दळवी, तिलकांचन गवस, संदिप गवस, योगेश महाले राजेश गवस, हर्षद सावंत, बाजीराव देसाई, गुरुदास सावंत, शुभम गवस हे उपस्थित होते. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणूक बाबत अशोक दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणूक होत आहेत.