ठेकेदार तुमचा कोण नातेवाईक आहे का ? ; पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं

नितेश राणेंनी वेधलेलं करूळ घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 10, 2023 17:16 PM
views 318  views

सिंधुदुर्ग : करूळ घाटाची परिस्थिती वाईट आहे. लोक रस्त्यावरून जात नाही. भुईबावडा घाट चांगला झाला म्हणून जमलं. नाहीतर दोन्ही घाट नादुरुस्त होते. श्रीनिवासन हे अधिकारी काम करत नाही. मातीने खड्डे बुजवत आहेत. लोकांनी काम थांबवलं आहे. जर काम जमत नसेल तर तसे सांगा. आमदार नितेश राणे यांनी करुळ घाटाचे भीषण वास्तव मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. काम न करणे हे योग्य नाही. ठेकेदार तुमचा कोण नातेवाईक आहे का ?काम योग्य दर्जाचे का होत नाही ? असे सवाल करत काम दर्जेदार करा अशी सक्त सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिली.