...तर राष्ट्रवादी श.प.ची स्वबळाचीही तयारी

शरद पवारांची प्रवीण भोसलेंनी घेतली भेट
Edited by:
Published on: January 10, 2025 11:42 AM
views 195  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी  सदिच्छा भेट घेतली. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, सहकार, ग्रामपंचायत निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर वेळ पडल्यास लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे, त्याच बरोबर कार्यकर्त्यांनी महविकास आघाडीचे अस्तित्व महाराष्ट्रात आहे, पुढेही राहणार आहे याचेही भान सर्व स्तरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठेवले पाहीजे  अशीही सूचना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चेच्या माध्यमातून दिल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सांगीतले. तसेच यशवंतराव प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आमदार जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रतीनीधी यांच्या मीटिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सर्व स्तरावर लवकरच उभारी घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.