
कणकवली : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ही जागा भविष्यात शिंदे गट - भाजपमध्ये युती झाली तर निश्चितच शिंदे गटाकडे येईल. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ही जागा आमच्याकडे आल्यानंतर त्या जागेवर आम्ही सहज विजय मिळवू. जर किरण उर्फ भैय्या सामंत जागा लढवण्यासाठी इच्छुक असतील तर आम्हाला आनंदच आहे. कारण ह्या जागेसाठी ते पात्र व योग्य उमेदवार आहेत, असे भाष्य शिंदे गटाचे माजी खासदार सुधीर सावंत यांनी केले आहे.
कणकवली येथील पत्रकार परिषदेत पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते . यामुळे किरण उर्फ भैय्या सामंतानी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅक टू बॅक सुरू केलेल्या गाठीभेटी दौऱ्यामुळे ते शिंदे गटाकडून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.