आरोग्य व्यवस्थेच्या भगिनींना न्याय कधी मिळणार ?

तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 30, 2022 18:36 PM
views 229  views

सिंधुदुर्ग : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारतातील आरोग्य व्यवस्था जगासमोर एकीकडे एक पाऊल पुढे टाकत असताना महाराष्ट्रातील 529 NRHM परिचारिका यांना तडकाफडकी काढुन टाकण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून समजले जाणारे आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका यांना काढण्यात आले. या परिचारिकांचा न्यायासाठी लढा सुरू आहे. त्यांचे सिंधुदुर्गनगरी इथं ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, ग्रामीण भागातील लोकांशी आरोग्याची घराघरातील माहिती असणारे सिस्टर यांना आज माञ रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत बसावे लागले आहे. याला जबाबदार कोण ? मंञ्यांना पेंशन देताना एकमत होत, मग परिचारिकांना पगार देताना सरकार एवढे भिकारी कस ? पगार द्यायला कारण नसल्याचे सांगून त्यांना कमी करण्यात आले. माञ आज ही आरोग्य उपकेंद्र येथे हजारो रिक्त पदे असुन त्याच जागांवर कंञाटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारिकांवर अन्याय का ? तस ठरवल तर प्रत्येक मंञ्यांनी आपले एक एक मानधन जरी पुढे केल तरी या 529 परिचारिकांना उपासमारीची वेळ येणार नाही. 

गेले 8 दिवस हिवाळी अधिवेशन चालु असताना एकाही मंञ्यांनी याची दखल घेतली नाही ही गोष्ट लज्जास्पद आहे .आश्वासन खुप देणारे मिळतील न्याय देणाऱ्या हातांची गरज सध्या आहे. गेले तीन महिने हा नाहक ञास सहन करत फक्त मंञ्याच्या आणि अधिकारी यांच्या आशेवर असणाऱ्यां परिचारिकांची दखल मुख्यमंञी व आरोग्य मंञी यांनी घ्यावी व लवकरात लवकर या अशा सर्व NRHM कंञाटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमित करुन येणारे वर्ष आनंदाने होऊन त्यांना न्याय मिळावा, ही विनंती