कणकवली शहरातील तो कृत्रिम धबधबा कधी सुरू होणार ?

Edited by:
Published on: March 27, 2025 20:42 PM
views 813  views

कणकवली : कणकवली गणपती साना येथे बाराही महिने वाहणारा  कृत्रिम धबधब्याचे उद्घाटन होऊन गेली चार महिने उलटले  तरी देखील हा धबधबा अजून सुरू झाला नसल्याचे दिसत आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा कृत्रिम धबधबा सध्या धुळखात असल्याचे दिसत आहे.

कणकवली शहरासह अन्य  सर्वसामान्यां लोकांस बाराही महिने वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली आंघोळ करत आनंद लुटता यावा आणि पर्यटन दृष्ट्या  हे ठिकाण विकसित व्हावे या दृष्टीकोनातून हा धबधबा सुरू करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी या धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत हा धबधबा सुरू झाला नसल्याचे दिसत आहे. यासंबंधी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले की हा धबधबा सुरू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तांत्रिक अडचणी दूर करत निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू  असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले 

पण उन्हाळ्याच्या कालावधीत आणि सुट्टी मध्ये मुलांना धबधब्यांचे जास्त आकर्षण असते त्यामुळे हा धबधबा सुरू होण्यासाठी अजून किती दिवस कणकवलीवासीयांना वाट लागेल हेच पाहावे लागणार आहे.