स्थानिक कलावंतांना संधी मिळणार तरी कधी..?

▪️ महासंस्कृती महोत्सवात स्थानिक संस्कृतीचा अभाव
Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 08:38 AM
views 572  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गात सावंतवाडी इथं शासनाचा पाच दिवसांचा महोत्सव आजपासून सुरु होतोय. ज्या सिंधुदुर्गात हा 'महासंस्कृती महोत्सव' होतोय त्यात सिंधुदुर्गची संस्कृती कुठेच दिसत नाही आहे अशी भावना सिंधुदुर्गवासिय व्यक्त करत आहेत. यात कोकणची कला दशावतार, चित्रकथी, कळसूत्री , लेदर पपेटस्, समईनृत्य, चपय नृत्य, गोफनृत्य, धालो-फुगडी-घोडेमोडणी आदी कोणत्याच लोककलेचा समावेश करण्यात आलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक संस्था दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यांचा कुठेच समावेश नाही.  पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अत्यंत लाडके आणि नेहमीचे यशस्वी कलाकार या महोत्सवात आहेत अशी भावना सिंधुदुर्गवासिय व्यक्त करत आहेत. या सर्व कलाकारांचे सिंधुदुर्गात स्वागत असून त्यांना विरोध नाही. पण, इथल्या स्थानिक कलावंतांना, लोककलाकारांना शासन संधी कधी देणार ? स्थानिक कलाकार आणि लोककलाकारांना पाचपैकी एक दिवस नक्की देता आला असता अशी शोकांतिका सिंधुदुर्गवासिय व्यक्त करत आहेत.