
मालवण : खरंतर चिंदर उपसरपंच हे ठरल्या प्रमाणे नाटेकरच बिनविरोध बसणार होते. पण चिंदरकर गावात नाही हे बघून गावात तातडीने मीटिंग लावून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम होत आहे हे लक्षात आल्यावर भाजपा टीम सक्रिय झाली. आणि आक्काचा डाव उधळला. कोदेंचे आका मांजरेकर यांच्या घरी पाच लाखाचा पाळणा घेऊन दीड तास काय करत होते हे कोदेनीच जाहीर करावे असे आव्हान भाजपा चिंदर प्रभारी संतोष गावकर यांनी कोदेना दिलं आहे.
संतोष गावकर यांनी पुढे म्हटले आहे, तुमच्या आक्कानी धोंडी चिंदरकर यांना हलक्यात घेतल्याने नेहमी त्यांचा धोबी पच्छाड होत राहिला. धोंडी चिंदरकर यांचा वाद हा शिंदे गटाशी किंवा राणे कुटुंबाशी नाही. त्यांचा वाद हा गटबाजीच्या जनकाशी आहे. राणे नाव बाजूला ठेऊन फक्त गावा गावात किमान ५० लोकांची तरी मीटिंग लागेल का ही शंका आमच्या मनात आहे. एवढ्या मोठ्या चिंदर गावात गाड्या, जेवण व्यवस्था करून फक्त मोजून २४ माणसं गावातील होती. त्याचवेळी समज असायला हवी होती की गावातील लोक विकास कामाला महत्व देतात रोख रकमेला नाही. आणि मांजरेकर हे विकाऊ नाहीत तर ते सुशिक्षीत प्रामाणिक व उच्च विभूषित आहेत. कोदे आमचे मित्र आहेत, फक्त त्यांनी सांगाव की तुमची भावजय सरपंच होती तेव्हा महेंद्र मांजरेकर यांचा पाठिंबा का घेतला? याचा खुलासा करावा आणि मांजरेकर व्हिडीओ स्टेटमेंट पाहून घ्यावा. आणि आपले अज्ञान दूर करावे असा सल्ला भाजपा चिंदर प्रभारी संतोष गावकर यांनी दिला आहे.