केसरकरांसमोर तेली एकनाथ शिंदेंना काय सांगतायत...?

Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2023 12:06 PM
views 220  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर व भारतीय जनता पार्टीच सावंतवाडीतील विळा भोपळ्याच नातं सर्वश्रुत आहे. दीपक केसरकर यांची वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यानिशी सांगणार असं भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले होते. दरम्यान, सावंतवाडीत विकासकामांच्या शुभारंभासाठी एकनाथ शिंदे सावंतवाडीत येणार असल्यानं मंत्री केसरकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी दीपक केसरकर व राजन तेली एक ठिकाणी आले. यावेळी क्लिक केलेल्या फोटोत राजन तेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. सध्या या फोटोची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.