विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी काय म्हणाले गटशिक्षणाधिकारी...?

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 01, 2023 18:00 PM
views 495  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला शिक्षकेने बेदम मारहाण केल्याप्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याची माहीती कुडाळचे गटशिक्षणाधिकारी  संदेश कींजवडेकर यानी दीली. दरम्यान केंद्रप्रमुखालाही चौकशी अहवाल देण्याचे सांगितले आहे केंद्रप्रमुखाचा अहवाल आल्यावर याप्रकरणी वरीष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे त्यानी सांगितले.

याबाबत माहिती देताना गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर यांनी सांगितले की, सोनवडे शाळेतील विद्यार्थिनीला मारहाण झाल्याची तक्रार विद्यार्थीनीचे पालक यांनी शिक्षण विभागाकडे केली ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण स्वतः या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. तसेच केंद्रप्रमुखामार्फतही चौकशी करण्यात येणार आहे. आपण केलेल्या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. आता केंद्रप्रमुखांकडून चौकशी अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे.

कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनीला मारहाण झाल्याची घटना घडली. एका चिठ्ठीच्या कारणावरून ही मारहाण शिक्षिकेने केली. या विद्यार्थिनीला त्या शिक्षिकेने बेदम मारहाण केली त्यात तिला मुका मारही लागला आहे. काठीचे ओळ उठले आहेत. ही मारहाण त्या शिक्षिकेने शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर जाब विचारून केली.

त्यामुळे ती विद्यार्थिनी तणावाखाली होती ही मारहाण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली. हे प्रकरण आल्याचे सांगण्यात आले. याबाबत कुडाळचे गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर यांना विचारले, असता त्यानी सांगितले या विद्यार्थिनी मारहाणप्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पालकांच्या लेखी तक्रारीनंतर ही चौकशी सुरू झाली.

आपण संबंधित शाळेत जाऊन चौकशी केल्याचे किंजवडेकर यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल कडे सादर केला आहे. तर केंद्रप्रमुखांचा अहवाल यायचा आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. संबंधित विद्यार्थ्यीनीच्या पालकांनी तक्रार मागे घेतल्याचे आपल्याकडे काहीही आले नसल्याचे गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यानी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.