कोकणातील 'हा' महत्वाचा घाट खचला

वाहतूक ठप्प
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 08, 2022 17:17 PM
views 233  views
हायलाइट
फोंडा व भुईबावडा घाटमार्गे वाहतूक वळविली

वैभववाडी : तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. घाटात रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प झाली. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार झाला आहे. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. फोंडा व भुईबावडा घाटमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.