हुमरमळा रामेश्वर शाळेची सुसज्ज इमारत वैभव नाईकांमुळे : अतुल बंगे

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 04, 2025 13:55 PM
views 119  views

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळा नवीन इमारत बांधकामासाठी सोळा लाख रुपयांचा निधी आमदार असताना वैभव नाईक यांनी मंजूर केल्यानेच आज आमच्या शाळेला सुसज्ज इमारत मिळाली असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले.

हुमरमळा श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळेच्या नुतन इमारतीचे आज उद्घाटन हुमरमळा वालावल उपसरपंच रश्मी वालावलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व मुख्याध्यापीका स्नेहल फणसेकर यांच्या हस्ते फीत कापून नुतन इमारतीमध्ये प्रवेश केला. यावेळी बंगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले, या शाळेच्या इमारतीमध्ये मुलांना बसविणे धोक्याचे झाले होते. अशाच एका कार्यक्रमात माजी आमदार वैभव नाईक आले असता या शाळेची भयावह परीस्थिती बघितली आणि तातडीने सोळा लाखाचा निधी देऊन आज प्रत्यक्ष पालक आणि विद्यार्थी यांचे समवेत नुतन इमारतीमध्ये प्रवेश करताना आनंद होत आहे असे सांगून बंगे म्हणाले. या शाळेचे कंपाऊंड, मुतारी आणि शाळेच्या काही उर्वरित सुविधा आहेत त्या सरपंच अमृत देसाई आणि आपण पुर्ण करण्याची ग्वाही श्री बंगे यांनी दिली. तसेच या शाळेचे मुख्याध्यापीका स्नेहल फणसेकर आणि शिक्षीका गोसावी यांचे शाळेसाठी काम व शैक्षणिक प्रगतीकडे गांभीर्याने लक्ष आहेत असेही बंगे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच रश्मी वालावलकर, माजी सरपंच अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्य  मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर,पोलीस पाटील सुबोध सावंत, जेष्ठ ग्रामस्थ शरद वालावलकर, दत्ता गुंजकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीप्ती परब, संदेश चव्हाण, भरत परब, शाळा उपाध्यक्ष सुप्रिया परब, पांडु गुंजकर, महेश कानडे, नाथा राणे,  दीशा परकर, प्रदीप मार्गि,  राणे, मुख्याध्यापीका स्नेहल फणसेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षीका सौ गोसावी यांनी केले. शाळेचे काम दर्जेदार केल्याबद्दल ठेकेदार गुरु प्रसाद तवटे यांचा शाल श्रीफळ देऊन अतूल बंगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.