
देवगड : देवगड तालुक्यातील पुरळ हूर्शी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुसज्ज क्रीडांगण निर्माण करून देण्यात आले. या क्रीडांगणाचा नामफलक अनावरण सोहळा अनंत करंदीकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी विकास दीक्षित, निरंजन दीक्षित, अनंत करंदीकर, धोंडू तिलॉटकर, रवींद्र तिर्लोटकर, सुरेश देवळेकर, महेश वानिवडेकर, संदीप थोटम, बाळू मुळम, दत्ताराम भाटले, आदी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंदार तिर्लोटकर, उपाध्यक्ष गाणेश आलव व शाळा व्यवस्थापन तीन समित्या व माहिला वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदीप चव्हाण, मनोगत विकास दीक्षित, अनंत करंदीकर, निरंजन दीक्षित यांनी, तर सूत्रसंचालन करून आभार मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांनी मानले.