
मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी भुषविले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. शैलेश भैसारे, प्रा. संजय इंगोले, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. संगीता घाडगे, डॉ. सुरज बुलाखे, प्रा.तमन्ना मोरे मान्यवर यांची उपस्थित होते. दिया रेवाळे हिने सर्वाचे शाब्दिक स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचे गुलाबपपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयामध्ये नुकत्याच रूजू झालेल्या प्रा. तमन्ना मोरे यांचे प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शिक्षकांच्या वतीने नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या जहाना शेख, प्रचिती देवकर, वृत्तिका खैरे, सुहानी दुर्गवले, रोहिणी वनगुले या द्वितीय व तृतीय वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांमधून श्रावणी मालुसरे व अथर्व जोशी या विद्यार्थ्यांची ‘बेस्ट फ्रेशर’ म्हणून निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच आपल्या अंगी असलेल्या सुप्तगुणांनाही वाव द्यावा. यासाठी महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी विविध विभागांच्या मार्फत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याकरिता विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करावा यावेळी त्यांनी महाविद्यालय व संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूणाली सागवेकर हिने तर शेवटी आभार सलोनी जाधव हिने मानले.