तुतारी एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकात येताच भाजपकडून स्वागत...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 04, 2023 15:25 PM
views 1474  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व कोल्हापूर जिल्हातील दाजीपूर, राधानगरी भागातील नागरिकांना सोयीस्कर असणारी मुंबई दादर येथून सुटणारी तुतारी एक्स्प्रेसला कोरोना काळापासून नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे गेली दोन वर्षे थांबा बंद होता. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची भेट घेतल्यानंतर थांबा तातडीने मंजूर केल्यानतंर शुक्रवारी तुतारी एक्स्प्रेस नांदगाव येथे दाखल झाल्यानंतर जिल्हा, तालुका भाजप कार्यकर्त्यांसह त्रिमुर्ती रिक्षा संघटना, नागरीक व प्रवाशांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती मनोज रावराणे,भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक, संतोष रावराणे,अजय रावराणे,प्रविन पन्हाळकर, मनाली गुरव,भाई मोरजकर,अनुजा रावराणे,सुनील लाड,छोटू पारकर,अमृत चौगुले,रविंद्र सावंत,दोमोदर नारकर,बाबू घाडी अशोक बोभाटे, सुनील रावराणे, अलंकार रावराणे, महेंद्र रावराणे, प्रदिप रावराणे, सचिन राणे,प्रविन सावंत, स्नेहलता नेगवे, कल्पना सावंत, रमेश तेली, अर्चना किल्ले, अनिता पवार, प्रियांका साळसकर, संदिप गुरव दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते, नागरीक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         

.