
सिधुदुर्गनगरी : सिधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या तिकीट कोटा, जलद गाड्या थांबा यासह विवीध प्रश्नी लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावू असे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन समस्यांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिधुदुर्गनगरी विश्रामगृह येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष शुभम परब सरचिटणीस प्रकाश पावसकर संतोष वालावलकर, कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर, स्वप्नील गावडे, भाऊ पाताडे, संजय वालावलकर आदि उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.