महिला आमदार विधानसभेत पाठवून सिंधुदुर्गात इतिहास घडवू..!

वाढदिनी अर्चना घारेंवर शुभेच्छांचा वर्षाव
Edited by: विंनायक गावस
Published on: December 01, 2023 15:25 PM
views 184  views

सावंतवाडी : कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस त्यांच्या संपर्क कार्यालया ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्वस्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून राबविण्यात येत आहेत. अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अर्चना घारेंना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. २०२४ चा वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू, महिला आमदार सिंधुदुर्गातून विधानसभेत पाठवत इतिहास घडवू असं मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केलं.

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्तांनी मोठ्या संख्येने अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या. केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, शरद पवार व सुप्रिया सुळे यांची निवड चुकलेली नाही. पवारांची निवड ही योग्यच असते‌‌. त्यामुळे २०२४ ला आमदार म्हणून अर्चना घारेंना निवडून देत इतिहास घडवू, महिला आमदार विधानसभेत पाठवू असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, अर्चना घारे या माझ्या लहान बहीणीसारख्या आहेत. त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं जिल्हाध्यक्ष म्हणून करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागे आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही याची खंत आहे. पण, त्या खचल्या नाहीत. सतत काम करत राहिल्या. सत्ता असो वा नसो त्यांचा मतदारसंघातील झंझावात त्यांनी  कायम ठेवला. कार्यकर्ते उभे करण्याच काम त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आमदार झालेली नाही. महिलांचा आमदार निवडून देत पुढच्या १ डिसेंबरला आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करू असं मत त्यांनी व्यक्त केलं.

शुभेच्छांना उत्तर देताना अर्चना घारे-परब यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज तुमच प्रेम पाहून भरून आलं आहे. तुम्ही दिलेल्या किंमती वेळाची शब्दात तुलना करता येणार नाही. अनेक प्रश्न इथे आहेत. ते मार्गी लावण्यासाठी माझा भर असणार आहे. तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा पाहून माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस होता आहे. या निमित्ताने १ ते १२ डिसेंबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवित आहोत. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन करत अर्चना घारे-परब यांनी ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळर, संदीप गवस, पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळ चमणकर, राजन म्हापसेकर, रेवती राणे, सायली दुभाषी, सागर नाणोसकर, विशाल जाधव, सुदेश आचरेकर, दिपीका राणे, देवेंद्र टेमकर, सावली पाटकर, योगेश कुबल, जयप्रकाश चमणकर, रशीद शेख, नईम मेमन, सचिन पाटकर, संदीप घारे, पुजा दळवी, विनायक परब आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.