'त्या'वेळी आपण राजकारणातही नव्हता..!

केनवडेकरांचा खोबरेकरांना टोला
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 17, 2024 11:36 AM
views 309  views

मालवण : २०१४, २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर १९९० सालच्या निवडणुकीपासून माझ्या वार्डमध्ये माझ्या बुथ वरती शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता. व पोलिंग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथवर टेबल लावत होतो. घरोघरी जाऊन प्रचार करत होतो. त्यावेळी आपण राजकारणातही नव्हता. असा पलटवार भाजपा मालवण शहर प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना लगावला आहे. 

हरी खोबरेकर यांनी केलेल्या टीकेला केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढत प्रत्युत्तर दिले आहे. केनवडेकर यांनी म्हटले आहे, उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली आहे. वैयक्तिक टीका टिपणी करणे आम्ही कधी पण टाळत असतो. माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू हे माझे गुरु आहेत. गुरुंची सेवा करणे मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही आणि वाटणारही नाही. पण हरी खोबरेकरांना सांगू इच्छितो की २०१४, २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर १९९० सालच्या निवडणुकीपासून माझ्या वार्डमध्ये माझ्या बुथ वरती शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता व पोलिंग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथवर टेबल लावत होतो. घरोघरी जाऊन प्रचार करत होतो. त्यावेळी आपण राजकारणातही नव्हता. शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून माझ्या घरावरती पण दगडफेक झाली होती. त्यात माझे वडील जखमी झाले होते. त्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे  एकमेव नेते माझी विचारपूस करण्यासाठी आले होते. जनतेला  माहिती आहे आम्ही काय प्रचार केला ते. आपण सांगण्याची काही जरुरी नाही. त्याचबरोबर आम्ही आमच्या गुरुची सेवा केली आहे. आपण कोणाची सेवा करत असता हे पूर्णपणे जग जाहीर आहे. गुरुची सेवा करत असताना मला कधी मागच्या दाराने पळून जाण्याची माझ्यावर नामुष्की आली नाही असाही टोला त्यांनी लगावला.