
सावंतवाडी : माडखोल येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कॉर्नर बैठक घेत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा असं आवाहन केल. संघर्ष आम्ही केला, आयती फळे विनायक राऊतांनी खाल्ली. राणेंनी काय केलं ? असे विचारणाऱ्या विनायक राऊतांनी स्वतः काय केलं याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल असं आव्हान दीपक केसरकर यांनी दिलं. माडखोल येथील बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, महिलांच्या हाताला रोजगार देऊन ८० ते १ लाख रुपये महिलांच्या हातात मिळणार यासाठी कुक्कुटपालन योजना राबविण्यात येत आहे. आम्ही जाहिराती करत नाही. आम्ही काम करतो. नारायण राणे निवडून आले तर मिळणारे मंत्रिपद आपले हक्काचे असेल. हे हातचे जाऊ न देण्यासाठी नारायण राणे यांना विजयी करायला हवे. खोटा प्रचार करणाऱ्यांना गावागावातून उत्तर द्यायला हवे असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, अँड. निता सावंत आदी उपस्थित होते.