आम्हाला खोक्यांची गरज नाही : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 26, 2024 07:54 AM
views 145  views

सावंतवाडी : आमची चार  पिढ्यांची श्रीमंती आहे. त्यामुळे आम्हाला खोक्यांची गरज नाही. तुम्हाला जर पैसे कमी असतील तर आम्ही तुम्हाला देऊ असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला लगावला. माजगाव येथील जनसंपर्क यात्रे दरम्यानच्या सभेमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, मला मिळालेले मंत्रिपद हे तुमचे आहे. तुमच्यासाठी आम्ही काम करतो. विकासासाठी एवढं निधी दिला. पण, आम्ही केव्हाही नारळ फोडायला आलो नाही. त्यामुळे मला जसे प्रेम दिले तसेच प्रेम या निवडणुकीत नारायण राणेंना द्यावे असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले. माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क यात्रेतील सभेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे नेते महेश सारंग, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, अँड. निता कविटकर आदी उपस्थित होते.