
देवगड : देवगड जामसंडे शहरात तसेच तालुक्यातील अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा बंद झाला असून नागरिकांना पाणी टँकर ने विकत घ्यावे लागत आहे. स्थानिक नगरसेवक आमने - सामने या कार्यक्रमा वेळी सांगतात देवगड टँकर मुक्त आहे. मग नागरिकांना टँकर ने पाणी विकत का घ्यावे लागत आहेत असा नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.नगराध्यक्ष व नगरसेवक यांना त्याचं गांभीर्य दिसून येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी झाला.देवगड जामसंडे चा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना टँकरनेच पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे में महिन्यात देवगड तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात देखील भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.भूगर्भातील पाणीसाठा सुमारे २०० ते २५० फुटाच्या खाली पोहोचला आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी कमी झाले तर विहिरींनी पण तळ गाठला आहे. अशी भयानक स्थिती दिसत आहे.
देवगड व जामसंडे ही दोन शहरे दहिबाव अन्नपूर्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत में महिन्याच्या आधीच नदीपात्रातील पाणीसाठाच कमी झाल्यामुळे देवगड व जामसंडे येथील नागरिकांचा आता पाणीपुरवठा बंद झाला आहे. देवगह तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांमध्ये यावर्षी पाणीटंचाईला तोड देण्याची वेळ आली आहे. यंदा वरुणराजाने अवकृपा केली आहे.
शिरगाव पाडागर व दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीतील पाणी पातळी घटली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा ही योग्य प्रमाणात झाला नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्येच तीव्र पाणीटंचाईचे सावट जनतेवर येण्याची चाहूल लागली होती. त्यामध्ये देवगड व जामसंडे या दोन शहरांमध्ये त्याची तीव्रता जास्त जाणवू लागली. बहुतांशी भागांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जात आहे.
सर्वसाधारणपणे १५० ते २०० फुटापर्यंत बोअरवेलचा पाणीसाठा असल्याचे दिसते. या पाणी पातळीपर्यंत मे महिन्यापर्यंत किमान पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते.परंतु यावेळी मार्चमध्ये २०० फुटाच्या खाली पाण्याची पातळी गेली होती असे चित्र निर्माण झाल्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात ऐन मार्च महिन्यामध्येच जाणवू लागली होती. देवगड व जामसंडे शहरासाठी पाणी पुरवठा हा दहिबाव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातून होत आहे. पाडाघर येथील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे दहीबाव अन्नपूर्णा नदी पात्रातून पाणीपुरवठा देवगड जामसंडेसाठी करण्यात येतो. दरदिवशी या नदीपात्रातून २२ तास पाणी उपसा केला जातो, त्यातून सुमारे २० लाख लिटर पाणी खेचले जाते. हे उपलब्ध पाणी देवगड व जामसंडे येथे सोडण्यात येते. आजच्या स्थितीला नदी पात्रातील पाणीसाठा घटला आहे.पाणीच घटल्यामुळे देवगड जामसंडे पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टँकर ने विकत घेन्याची वेळ आली आहे..
पंपिंग यंत्रणेतील बिघाडामुळे देवगड जामसंडेमधील पाणीप्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.पंपींग दुरूस्तीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.दुरूस्तीअंती पाणीपुरवठा सुरू होईल असे नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांनी सांगीतले दरम्यान वारंवार पाणीपुरवठा याना त्या कारणाने बंद पडत असल्यामुळे देवगड जामसंडेमधील नागरिकांना पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे.लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया आटोपली तरीही राजकीय नेतेमंडळी निवडणुकीच्या धामधुमीतून अद्याप बाहेर पडली नसून त्यांना जनतेच्या पानी प्रश्नाबाबत काहीही देणेघेणे नाही अशा स्थितीत देवगडमधील राजकीय नेतेमंडळी आहेत याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दहिबाव नळयोजनेची वारंवार पाईपलाईन फुटणे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटणे यामुळे देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न वरचेवर गंभीर होतो.त्यातच पाईपलाईन फुटल्यानंतर पाणीपुरवठा चार-चार दिवस बंद राहतो यामुळे नागरिकांवर भीषण पाणीसंकट उद्भवते असे असतानाच आता पंपीग यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे.दुरूस्तीसाठी कोल्हापूर येथून पंप दुरूस्त करणारी यंत्रणा बोलावली आहे.यामुळे पंप दुरूस्त होताच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली.मात्र पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न उद्भवूनही राजकीय नेतेमंडळी गप्प आहेत.सध्या नागरिकांना मोठी किंमत मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे.पुर्वी एक हजार लिटर पाण्याचा टाकीसाठी पाणी विक्री करणारे व्यावसायिक संबंधित पाणी विक्रेत्या टेम्पोधारकांकडून ५० रूपये घेत आता १०० रूपये घेत असल्याने पाणी विक्रेते टेम्पोधारक नागर{कांकडून ३५० रूपयांवरून ४५० रूपये घेत आहेत त्यात अंतर जास्त असल्यास ५०० ते ६०० रूपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.सुट्टी पडल्याने बहुतांशी मंडळी गावी आली आहेत यामुळे घरातील माणसांची संख्या वाढली आहे.अशा सद्यस्थितीत वारंवार पाणीपुरवठा बंद राहत असल्याने भीषण पाणीटंचाईला देवगड जामसंडे वासीयांना सध्या सामोरे जावे लागले असून याची ना राजकीय नेतेमंडळींना चिंता , ना प्रशासनाला चिंता. निवडणुकीच्या धामधुमीतून स्थानिक राजकीय नेतेमंडळी, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकही बाहेर पडले नसून कोणताही नगरसेवक देवगड जामसंडेमध्ये सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी तब्बल आठ दिवसाने पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये शिरगाव पाडाघर योजनेतील तांत्रिक बिघाड तसेच अन्नपूर्णा नदीपात्रातील कमी पाणीसाठा ही प्रमुख कारणे होती. गेल्या वर्षी अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम केल्यामुळे काही प्रमाणात नदीपत्रातील पाण्याची पातकी वाढली होती. यावर्षी प्रचंड उष्णता व कमी पाऊस या दोन मुख्य कारणामुळे पाणीपातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. व मे महिन्यामध्ये बहुतांशी गावामध्ये पाणीटंचाईचे अस्मानी संकट उभे राहिले आहे.दरवर्षी प्रमाणे देवगड व जामसंडे या शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा आठ दिवसाने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असेच दिसत आहे. या भीषण परिस्थितीमुळे लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. दरवर्षीच येथील जनतेला पाणी विकत घेण्याची वेळ येते. परंतु यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. दहिबाव पाणी योजनेच्या पंपिग यंत्रणेत सातत्याने बिघाडा होत असतात त्यातच जलवाहिनी बहुतांशी भागांमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात आहे. नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होताना दिसत नाही मुळातच दहीबार अन्नपूर्ण नदीपात्रातून जलवाहिनीच्या माध्यमातून केला जाणारा पाणीपुरवठा हा नेहमीच अडचणीचा मुद्दा ठरलेला आहे. या पात्रातील पाणी पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. येथील ग्रामपंचायत पंपिंग करून पाणी खेचत असतात एकीकडे देवगाड व जामसंडे व पंचक्रोशीतील गावे असा पाणीपुरवठा या नदीतून होत असल्याने येथील पाणीसाठा हा नेहमीच कमी होतो.या पात्रातील पाणी कमी होते. शिरगाव पाडाघर येथील नदीपात्र बारमाही पाणी वाहत असते. परंतु हे पाणी योग्यप्रकारे साठवून करण्याची उपायोजना अद्यापही केली नसल्यामुळे देवगड जामसंडे व इतर गावांना मुबलक प्रमाणात पाणी देता येत नाही. उन्हाळ्याचा हा एक महिना शिल्लक आहे. अशाप्रसंगी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामपंचायत व नगरपंचायतीला जनतेला पाणी कशा प्रकारे द्यावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.