
दोडामार्ग : गोवा दोडामार्ग खोलपे येथे एका कार्यक्रमच्या तसेच शेतकरी बांधवांचा अभ्यास दौरा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या गोवा राज्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाला भेट दिली. तसेच फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी गोवा जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता तसेच सिंधुदुर्ग जलसंपदा कालवा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे, देसाई, इ. उपस्थित होते. तसेच गोवा राज्यातील काही शेतकरी तसेच अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या लोकांचा सहभाग होता.
महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त तिलारी प्रकल्प आहे. या ठिकाणी शुक्रवारी दुपारनंतर त्यांनी तिलारी धरणाला भेट दिली. मुख्य धरणाला तसेच तेरवण मेढे उन्नैयी बंधारा धरण, तसेच तिलारी धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती केली जाते या ठिकाणी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी भेट दिली. कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी मंत्री सुभाष शिरोडकर यांना सर्व आवश्यक माहिती दिली.