देवगडात पाणी गुणवत्ता प्रशिक्षण

Edited by:
Published on: January 25, 2025 19:06 PM
views 270  views

देवगड : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेशी निगडीत पाणी गुणवत्ता प्रशिक्षण  इंद्रप्रस्थ हॉल देवगड येथे जि.प. सिंधुदुर्ग व जे .पी.एस. फाऊंडेशन लखनौ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या पाणी गुणवत्ता प्रशिक्षणाचे उद्घाटन क्षमता बांधणी  व प्रशिक्षण समन्वयक  इंदीरा परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले . यावेळी पंचायत समिती देवगड आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर ,कनिष्ठ अभियंता प्रज्ञा पोवार उपस्थित होत्या .

या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील जलसुरक्षक व महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते . या प्रशिक्षणात पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी  जैविक फिल्ड टेस्ट किट्स , रासायनिक फिल्ड टेस्ट किट्सद्वारे तपासणीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली . तर मास्टर ट्रेनर इंदीरा परब यांनी जलजीवन मिशन मार्गदर्शक सुचना , पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण मार्गदर्शक सुचना , जलसुरक्षक कामे व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले तर मास्टर ट्रेनर श्रद्धा खांडेकर यांनी  पाण्यापासुन होणारे आजार व उपाय याबाबत मार्गदर्शन केले .

दोन दिवस व तिन बॅच मध्ये झालेल्या या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी पहिल्या दिवशी गटशिक्षणअधिकारी श्रीरंग काळे तर दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षणात पंचायत समिती देवगड कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला . यावेळी वरीष्ठ सहाय्यक  स्वप्नजा बिर्जे , नितीन कोयंडे , श्रीम . लोके मॅडम, सिमा बोडेकर , प्रज्ञा पोवार ,मोहिनी खडपकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार इंदीरा परब यांनी मानले .