रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून वॉटर प्युरिफायर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 09, 2025 15:38 PM
views 109  views

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे वॉटर प्युरिफायर (जलशुद्धीकरण यंत्र) बसवण्यात आले आहे. माजी अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांच्या विशेष पुढाकाराने हे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले.

विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, माजी अध्यक्ष डॉ. संजय केसरे, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, दिनेश आजगावकर, शशिकांत चव्हाण, माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक, तसेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ. सानिका मदने, सौ. शिल्पा बिले, सौ. ऋतुजा परब, सौ. सोनल आजगावकर, सौ. पद्मा वेंगुर्लेकर, सौ. स्वप्नाली साळगावकर आणि सौ. राजश्री सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चेंदवणच्या पोलीस पाटील सौ. शुभश्री शृंगारे, ग्रामपंचायत सदस्य सौ. विजयश्री मेस्त्री, मुख्याध्यापक माणिक पवार आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उर्मिला गवस यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. उमेश धर्णे यांनी केले. रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.