शिरोड्यात प्राथमिक शाळेला पाणी पंप - साहित्य

मनिष दळवींच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2025 16:10 PM
views 42  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्राथमिक शाळा, शिरोडा - गावडेवाडी शाळेला  ग्रामपंचायत सदस्य जयमाला गावडे व अर्चना नाईक यांजकडून आवश्यक पाणी पंप व साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी शाळेचे शिक्षक भूषण नाईक व सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा बूथ अध्यक्ष प्रसाद परब, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विद्यार्थी, पालक, प्रतिनिधी, भाजप युवा मोर्चाचे प्राजेश गावडे, सूर्यकांत गावडे, सुनील नाईक, संजू कडू व इतर उपस्थित होते.