
बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून निगुडे पाटील वाडी या ठिकाणी पाऊस भरपूर पडला की पाणी येते पावसाच्या पाण्यामुळे तिथे जनजीवन विस्कळीत होते निगुड्यातून पाटील वाडी कडे जाणारा मार्ग आत्ता पूर्णपणे बंद आहे पुलावर पाणी आल्यामुळे वाहने जात नाही तलाठी गव्हाणकर यांनी पाणी घरात घुसलेल्या ठिकाणी पाहणी केली.
यावेळी दयानंद पाटील, श्यामसुंदर पाटील, नंदकिशोर पाटील, दशरथ पाटील, सिराजउद्दीन हेरेकर, माजी सरपंच शावियर फर्नांडिस, मार्शल गुडीनो, बेझमी गुडीनो, अरुण शेगडे, आधी ठिकाणी विचारपूस करून नुकसान वगैरे झालं का याची पाहणी केली निगुडे पाटीलवाडी स्ट्रीट लाईट विद्युत पोल तीन जमीन दोस्त झालेत.
यावेळी निगुडे उपसरपंच गौतम जाधव, माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, विद्युत वायरमन कुडव, ग्रामपंचायत कर्मचारी लहू जाधव आदींनी पाहणी केली.यावेळी सविस्तर अहवाल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केला जाईल असे तलाठी निगुडे यांनी सांगितले.तसेच पाणी पार्श्वभूमीवर आपण सतर्क रहा अशा सूचनाही तलाठी सौ.प्रणिता गव्हाणकर यांनी दिल्या.