
देवगड : जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो. याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक यांचा सत्कार पंचायत समिती देवगड अंतर्गत करण्यात येतो. यंदाचा उत्कृष्ट जलसुरक्षक म्हणून कुणकेश्वर मध्ये जलसुरक्षकाचे काम करणारा ऋषिकेश सुरेश चव्हाण याची निवड करण्यात आली आहे. कुणकेश्वर गावात गेली सहा वर्षाहुन अधिक वर्षे ऋषिकेश काम करत असुन पर्यटन दृष्टया महत्त्वाच या कुणकेश्वर गावात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते .पर्यटकांना व स्थानिक नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नळाद्वारे व सार्व. विहीरीचे पाणी शुद्धीकरणांची महत्वाची जबाबदारी ऋषिकेशची असुन ती तो योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडत असुन श्री. क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सवातही पाणी शुद्धीकरण करणे, ओटी टेस्ट घेणे यासारखी महत्त्वाची व जबाबदारीची कामे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत करत असतो . या विशेष कामगिरीची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी डाटा ऑपरेटर मोहीनी खडपकर, कनिष्ठ अभियंता पाणी व स्वच्छता विभाग प्रज्ञा पोवार व मान्यवर उपस्थित होते.