
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात गेली कित्येक दिवस दडी मारलेल्या पावसाने मागील काही दिवसात हजेरी लावली आहे. उद्या २८ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विजा चमकत असल्यास झाडाखाली न थांबता उघड्या जागेवर दोन्ही पायांच्या मध्ये डोके घालून उभे राहावे, तसेच भ्रमणध्वनीचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.