
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील नायशी येथील गणेशभक्त, रवींद्र जाधव उर्फ गुरव यांच्या घरगुती गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी, त्यांचा पुतण्या सुदेश अनंत जाधवने विठू माऊलीची मूर्ती व विठुरायाच्या भक्तांच्या प्रतिकृतीचे, कागद, पुठ्ठयाचा तसेच कापसाचा वापर करत पर्यावरण पूरक असा सुरेख वारकरी देखावा साकारला आहे. त्यांनी साकारलेला हा देखावा पाहण्यास ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तब्बल सात दिवस अहोरात्र मेेहनत घेऊन हा देखावा त्यांनी एकट्याने तयार केला आहे. विठ्ठला चरणी वारकरी नतमस्तक होत विनम्र भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांचा देखावा साकारत गणेश भक्तांची कौतुुकाची थाप जाधव यांनी मिळवली आहे. सुदेश हा खाजगी कंपनीत प्लंबर च काम करीत असून दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या गावी येऊन आपली अंगीकृत कला सादर करीत सुंंर देखावा सादर करीत असतो. त्यांनी 2022 मध्ये कैलास पर्वत ,2023 महाकाली देवी, तर या वर्षी विठुरायाच्या वारकरी संप्रदाय देखावा सादर करत रसिकांना मंत्र मुग्ध केलं आहे.