
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकला आहे. महत्वाच्या देवस्थानावर ही दावा केला गेला आहे अस विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली असून देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश या यादीत आहे. १५६ ठिकाणी वक्फ बोर्डान दावा केल्याच समोर येत आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले होते की, या बोर्डानं दावा ठोकल्यावर आपण न्याय देखील मागू शकत नाही. या काद्यात कोर्ट, अधिकाऱ्यांसह सर्व मंडळी ही विशिष्ट समाजाची असणारी आहेत. या कायद्याचा विचार अन् माहिती आपण घेतली पाहिजे व सावध झाल पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव विधेयक पारीत करत आहेत. इस्लामिक राष्ट्रामध्ये असा कोणाही वक्फ बोर्ड नसताना आपल्याच देशात का ? हा खरा प्रश्न आहे. हिंदुराष्ट्रात अशा प्रकरचे इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. देशात आणि राज्यात हिंदूच सरकार आहे. हिंदू नीही धर्माभीमान बाळगून कडवट पणा दाखवून पुढे यावे अस नितेश राणे म्हणाले होते. तसेच जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकल्याच विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत केला होता.