
चिपळूण : श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावकार रुग्णालय सावर्डे, चिपळूण ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी झटत आहे.अद्ययावत अश्या मॉडर्न वैद्यकीय सुविधा अल्प दरात कोकणात उपलब्ध केलेल आहेेत. ८०० बेड ने सुसज्ज असा आंतररुग्ण विभागात अनेक अतिदक्षता विभाग ,कार्डियाक सेंटर तसेच टाटा मेमोरियल केंद्राशी संलग्नित कॅन्सर विभाग गेली २० वर्षे सुरु आहे. किमोथेरपी, कॅन्सर शस्त्रक्रिया आणि हालसियोन कंपनीचे लिनिअर अक्सिलेटर अश्या अनेक सुविधांच्या कॅन्सर रुग्णांवर उपचार होत आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि अद्ययावत उपचार ची गरज लक्षात घेऊन, आजाराचे सूक्ष्म रूपात असतानाच निदान व्हावे आणि वेळेत योग्य उपचार सुरु व्हावेत म्हणून वालावलकर रुग्णालय सावर्डे, चिपळूण येथे सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिन विभागाची उभारणी केली आहे.
न्यूक्लियर मेडिसिन केंद्र एका भव्य इमारतीत उभारले आहे. ऍटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड च्या सर्व मान्यता या सेंंटरला मिळालेल्या आहेत. सेंटरमध्ये बसवलेली पेट सीटी स्कॅन, स्पेक्ट स्कॅन, न्यूक्लियर आयोडीन लो आणि हाई डोस थेरपी इत्यादी करता उच्च दर्जाची जीई कंपनीची मशिन्स आहेत. याद्वारे पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणार्या कार्डियाक व्हायबेलीटी, मूत्रपिंडाचे स्कॅन, कार्डियाक, यकृत, अस्थी, थायरॉईड ,अन्ननलिका यांचे स्कॅन आणि फुफ्फुसाचा रक्त पुरवठा मोजणे, आयोडिन थेरपी अशा सर्व उपचारपूर्व चाचण्या अल्प दरात रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.