दोडामार्ग बांदा राज्यमार्गाची लागली वाट | बांधकाम अधिकारी मात्र सुशेगात

Edited by: संदीप देसाई
Published on: June 29, 2023 20:03 PM
views 91  views

दोडामार्ग : बांदा दोडामार्ग राज्य मार्गावर जागोजागी खचलेली साईडपट्टी व रस्त्याच्या साईडपट्टिवर अतिक्रमण करून काही धनदांडग्यानी बुजविलेले गटार यामुळे या मार्गावरील प्रवास वाहतुकीस जीवघेणा बनला आहे. एकूणच या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तालुक्यातील नागरिकांवर विकतची आपत्ती ओढवली आहे. 

याच पार्श्वभूमीवर कळणे येथील ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांना घेराव घालून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या चव्हाण व बांधकाम खात्याला उद्या शुक्रवार पर्यंत साईट पट्टी दुरुस्ती करण्याची डेडलाईन दिली होती. तर या खचलेल्या साईड पट्टी बरोबरच या मार्गावर अनेक ठिकाणी धन दांडगे व काही महा भागांनी राज्यमार्ग आणि सर्व सामान्य हजारो भाविकांच्या दैंनदिन वाहतुकीचा कोणताही विचार न करता, आपल्या सोयीसाठी वाटेल तिथं खोदकाम करून साईड पट्टी बुजवून आपला स्वार्थ साधला आहे. परिणामी नुतनीकरण झाल्याने  निर्धोक झालेल्या या रस्त्यावर नाहक आपत्ती निर्माण झाली आहे. याकडे बांधकाम अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात येऊनही परिस्थिती जैसे थे आहे. उलट हा रस्ता आपल्या अखत्यारीत नसल्याचे कारण देऊन बांधकाम अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत आहे. 

गुरवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर सासोलीत लंडमाफियांनी कहर केला असून 200 मीटर रस्त्यावर तीन ठिकाणी राज्य मार्गाचा गटार बुजवून नागरिक व जनतेला वेठीस धरले आहे. खाजगी जमिनितील चिखल माती रस्त्यावर वाहून येऊन अपघात होत आहेत. तरीही बांधकाम अधिकारी संबधित त्या लँड माफी यांना आळा घालू शकत नाही आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अखेर काही जागरूक नागरिकांनी या प्रश्न आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार अरुण खानोलकर यांचे गुरुवारी लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनाही त्या ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी बांधकाम खात्याच्या  कारभाराबाबत संताप व्यक्त केला असून राज्य मार्गावर चुकीच्या पद्धतीने चिकल माती आणणाऱ्यांवर सक्त कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार यांनी बांधकाम खात्याला दिलेले आदेश तरी बांधकाम अधिकारी जुमानतील का आज खरा प्रश्न आहे.