खेर्डीतील आमदार चषक कबड्डी स्पर्धेत वाघजाई कोळकेवाडी संघ विजेता

आमदार शेखर निकम यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला उत्साहात
Edited by: मनोज पवार
Published on: March 06, 2025 11:08 AM
views 111  views

चिपळूण :  खेर्डी येथील  दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व खेर्डी ग्रामपंचायत माजी सदिशा  दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरविलेल्या  जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा "आमदार चषक-२०२५ " चा अंतीम सामना वाघजाई क्रिडा मंडळ कोळकेवाडी व दसपटी क्रिडा मंडळ दसपटी या दोन मातब्बर संघात अतितटीचा झाला. या सामन्यात वाघजाई क्रिडा मंडळ कोळकेवाडी संघाने रोमहर्षक लढतीत ३४-२६ असा ८ गुणांनी दसपटी क्रिडा मंडळ दसपटी संघाचा पराभव करत आमदार चषकावर नाव कोरले. 

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडु म्हणून कोळकेवाडी संघाचा प्रो कबड्डी स्टार अजिंक्य पवार यास गौरविण्यात आले तर सोबतच स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई कोळकेवाडी संघाचा राष्ट्रीय खेळाडु अभिषेक भोजने व उत्कृष्ट पक्कड दसपटी संघाचा प्रतीक चव्हाण यांनी पटकावले.

त्यानंतर स्पर्धेतील विजेता, उपविजेता, तृतीय व चतुर्थ क्रमांकावरील संघाना रोख बक्षीस व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

खेर्डीतील दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे हे सलग ३ रे वर्ष आहे. दाभोळकर यांच्या राईस मिल मागील कै. सागर दाभोळकर क्रिडानगरी मध्ये  कबड्डी स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील ८  नामवंत संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी ४ संघ विभागुन लिग पद्धतीने खेळवली गेली. यातील अंतीम दिवशी ४ संघानी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दसपटी क्रिडा मंडळ दसपटी संघाने न्यु हिंद विजय, चिपळूण संघावर तर दुसऱ्या सामन्यात वाघजाई क्रिडा मंडळ कोळकेवाडी च्या संघाने देऊळवाडी क्रिडा मंडळ, ओवळी संघावर मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

स्पर्धेच्या अंतीम सामन्यात वाघजाई क्रिडा मंडळ कोळकेवाडी संघाने रोमहर्षक लढतीत दसपटी क्रिडा मंडळ दसपटी संघावर ८ गुणांनी मात करत आमदार चषकावर नाव कोरले. या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा देऊळवाडी क्रिडा मंडळ,ओवळी संघ तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी न्यु हिंद विजय, चिपळूण संघ ठरला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणा प्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम ,प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसिलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने साहेब, माजी पंचायत समिती सभापती पुजा निकम, खेरडीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे,  उद्योजक दिपक सुर्वे, उद्योजक अनिल  दाभोळकर, सौ.निना दाभोळकर, युवानेतृत्व अनिरुद्ध निकम, युवक प्रदेश सरचिटणीस डाॅ.राकेश चाळके, हाॅटेल तेज ग्रॅन्ड चे मालक अजितद खताते, कुंभार समाजाचे कोकण विभागीय अध्यक्ष  प्रकाश साळवी, विनोद खताते, माजी उपसरपंच प्रसाद सागवेकर आदी उपस्थित होते.