कुसूरचा वाडीया जत्रोत्सव ९ - १० जानेवरीला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 05, 2023 10:42 AM
views 959  views

वैभववाडी : कुसूर गावच्या श्री रामेश्वर दारुबाई देवीचा वाडीया जत्रोत्सव पुढील महिन्यात होणार आहे.जानेवारी महीन्यात ९ व १० ला जत्रोत्सव होणार आहे.

कुसूर गावचा जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला होतो.यावर्षी मानक-यांना आलेल्या अडचणींमुळे ही यात्रा रद्द झाली आहे.ही यात्रा पुढील महीन्यातील ९,१० तारीखला होणार आहे. या यात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  देवस्थानकडून करण्यात आली आहे.