'सुट्टी नाही कर्तव्याचा दिवस' ; रत्नागिरी - सिंधुदुर्गसाठी उद्या मतदान

प्रशासन सज्ज !
Edited by: ब्युरो
Published on: May 06, 2024 13:53 PM
views 160  views

सिंधुदुर्ग : लोकसभेच्या सार्वत्रिकनिवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६  मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावाअसे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

                        जिल्ह्यातील ९१८ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. १२७ सेक्टर ऑफिसर आणि पोलिस सेक्टर ऑफिसर मतदानर केंद्रावर कायदा व सुव्यवस्था पाहणार आहेत.  ४५९ मतदान केंद्रावर वेब कास्टींगच्या माध्यमातून नजर ठेवल्या जाणार आहे. ९२ मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक (Micro Observer) असणार आहेत. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी जिल्‍हावाशियांना आवाहन करतांना आपल्‍या संदेशात जनतेने मोठ्या संख्‍येने मतदान केंद्रावर पोहोचावेअशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. अनेक दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून मंगळवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्‍यांनी  आवाहन केले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून  जिल्‍ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्‍याचे आवाहनही  त्यांनी केले.


            सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये १७१ पोलिस अधिकारी२०४२ पोलिस अंमलदार८८१ होमगार्डसीएपीएफची १ कंपनी एसआरपीएफच्या ३ कंपन्याएक क्युआरटी तैनात करण्यात आलेल्या आहेत.


६ लाख ६४ हजार ५६६ मतदार


जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख २७ हजार ७३५ (पुरूष- १ लाख १२ हजार ८४२स्त्री १ लाख १४ हजार ८९३)कुडाळ विधानसभा मतदार संघात एकुण २ लाख १२ हजार ३६० (पुरूष  १ लाख ५ हजार ९५१ स्त्री १ लाख ६ हजार ४०८तृतीय पंथी १) सावंतवाडी २ लाख २४ हजार ४७१ (पुरूष १ लाख १२ हजार ७९५ स्त्री १ लाख ११ हजार ६७६) असे एकूण ६ लाख ६४ हजार ५६६ मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. सावंतवाडीकुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक असे सखी मतदान केंद्रयुवक मतदान केंद्रदिव्यांग मतदान केंद्र आणि परदानशीन मतदान केंद्र असणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी सांगितले.