जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती

Edited by:
Published on: April 25, 2024 14:07 PM
views 104  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 'स्विप' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात ४ ठिकाणी महाकाय अशा एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आरोस येथे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत एअर बलुन हवेत सोडण्यात आला.  या बलुन वर लोकशाहीचा खरा आधार…मतदार, प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे, सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे….अशा प्रकारची जनजागृतीपर वाक्ये या बलुनवर लिहीण्यात आलेली आहेत.

कुडाळ येथे कुडाळ विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, सावंतवाडी येथे सावंतवाडी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, करणकवली विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या उपस्थितीत बलुन हवेत सोडण्यात आला.