
वेंगुर्ला : कोचरा गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून योगेश तेली आणली. गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेली पाच वर्षे आम्ही काम केले आहे. नागरिकांनी देखील या कामाच स्वागतच केले आहे. या विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीत मतदारांपर्यंत पोचलो आहे. त्यामुळे यावेळी योगेश तेली हेच सरपंच पदी विराजमान होणार असा विश्वास कोचरे सरपंच साची फणसेकर यांनी व्यक्त केला आहे.
कोकणसाद लाईव्हशी बोलताना साची फणसेकर म्हणाल्या की, गावात गेली पाच वर्षे आम्ही पारदर्शक कारभार केला. अनेक विकासकामे गावात केली आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत जनता आमच्या पाठीशी आहे. सरपंच पदाचे उमेदवार योगेश तेली व इतर कोचरा गाव विकास आघाडीचे सर्व सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
गावातील नागरिक हे सुज्ञ आहेत. ते विरोधकाच्या भुलथापांना बळी पडणार नाही. येथील जनता विकासाच्या बाजूनेच राहणार आहे. असा विश्वास साची फणसेकर यांनी व्यक्त केला आहे .