
सिंधुदुर्गनगरी : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० पर्यंत मतदान होणार आहे. यांनिमित्ताने मतदाराला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पदवीधर निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्याच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे.