३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी..!

Edited by:
Published on: September 27, 2023 18:55 PM
views 478  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधान परिषद  कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधी होणार आहे. जुनी नोंदणी झालेले पदवीधर  मतदार यादी  पुढील काळासाठी ग्राह्य नसून सर्व पदवीधर मतदारनी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.एक नोव्हेंबर 2020 पूर्वी  पदवी किंवा पदविका पूर्ण करणाऱ्या पदवीधरानी या काळात मतदार नोंदणी करावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केली आहे.

पदवीधर मतदान नोंदणीच्या या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी  विशाल खत्री आदी अधिकारी उपस्थित होते.