कणकवलीत मतदान जनजागृती कार्यक्रम...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 30, 2024 13:39 PM
views 86  views

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत  मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये दि.10/04/2024 ते दि.19/4/2024 या दरम्यान मतदार सेल्फी पॉईंट हा उपक्रम, मतदार हस्ताक्षर अभियान, मतदान जनजागृती संदेश देणारे पथनाट्य शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

दि.30/04/2024 रोजी आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे मतदान जनजागृती संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली. तसेच गुरुवार दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी ठीक 8:00 वा कणकवली नगरपंचायत कार्यालय ते आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी लोकशाही दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, कणकवली शहरातील मतदारांनी या मध्ये सहभागी व्हावे व दि.07 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी केले आहे.