
वैभववाडी : तालुक्यातील लोरे नं२ येथील सकंपाळवाडीत उभारलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उद्यापासून सुरु होतं आहे.तीन दिवसीय या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोरे गावातील संकपाळवाडीतील ग्रामस्थांनी विठ्ठल रखुमाईच भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. याचा जिर्णोद्धार सोहळा उद्यापासून सुरु होतोय.शुक्रवारी सकाळी ९ वा कलश मिरवणूकीने या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७ वा हभप संजय साळवी यांच किर्तन, रात्री १०नंतर स्थानिक भजने, दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी गणेश पुजन, पुण्यवचन, आचारविरण, नांदी श्राद्ध, देवता आवाहन, होमहवन, धान्यनिवास, जलनिवास, शैय्यानिवास आदी कार्यक्रम होणार आहेत.शेवटच्या दिवशी दि १९रोजी स्थापनेची पुजा, अभिषेक, मुर्ती स्थापना, हभप विनोद महाराज पाटील यांच्या हस्ते कलशारोहण, महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू , रात्री १० वा बुवा विनोद चव्हाण विरुद्ध बुवा समीर कदम यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
या जिर्णोद्धार सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.तालुक्यातील वारक-यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन लोरे संकपाळवाडी सहकारी मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांनी केले आहे.