विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचा राणेंना पाठींबा..!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 12:24 PM
views 126  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता दुरदृष्टी असलेला अभ्यासू नेता पुन्हा जिल्ह्यात होणे कठीण आहे. कोकणासह जिल्ह्याच्या विकासासाठी नारायण राणे यांना विजयी करणे आवश्यक आहे. त्यामुळे विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटना नारायण राणे यांच्या पाठीशी असून त्यांच्या मोठ्या मताधिक्यासाठी शेतकरी गावागावत प्रचारात उतरणार अशी ग्वाही विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी यानी नारायण राणे यांना दिली. मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मंगेश तळवणेकर बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण देऊलकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, संतोष हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत, भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक, संतोष नाईक आदी उपस्थित होते.